गोंडगावात पोलिसांवर दगडफेक : 16 संशयितांविरोधात गुन्हा


Stone pelting on police in Gondgaon: Crime against 16 suspects भडगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात तपासासाठी पोलीस पथक गोंडगावात संशयिताला घेवून आल्यानंतर आरोपीला आमच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेत पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या होत्या तर तीन पोलीस जखमी झाले होते. याप्रकरणी भडगाव पोलिसात 16 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दगडफेक प्रकरणी जमावाविरोधात गुन्हा
भडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील नराधम आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (19, भडगाव तालुका) यास तपासार्थ गुरुवारी सायंकाळी स्पॉट पंचनाम्यासाठी आणल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीवर दगडफेक केली. या घटनेत हवालदार नितीन तुकाराम रावते, हवालदार विलास बाबूराव पाटील व नाईक दिलीप संतोप पाटील जखमी झाले होते.







दगडफेकप्रकरणी हवालदार नितीन तुकाराम रावते यांनी भडगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, संशयित जगदीश सुकलाल धोबी, विशाल मोहन कोळी, सुरेश अर्जुन मोरे, शंकर गुरव, गोकुळ पंडित पाटील, भैय्या रवींद्र सोन्नी व इतर 10 ते 15 जणांच्या जमाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !