भुसावळातील मुस्लीम कॉलनीत चोरी : 23 हजारांचा ऐवज लंपास
Theft in Muslim Colony in Bhusawal : 23 thousand instead of loot भुसावळ : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून मुस्लीम कॉलनीत घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सैय्यद वहिम सैय्यद रशीद (44, मुस्लीम कॉलनी, उस्मानिया मशीदपुढे, जुन्या पाण्याच्या टाकीजवळ, भुसावळ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2 रोजी सायंकाळी पाच ते 3 ऑगस्ट रोजी रात्री 10.15 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 20 हजारांची रोकड तसेच तीन हजार रुपये किंमतीचे सोन्याचे एक ग्रॅम वजनाचे 10 मणी लांबवले. सैय्यद वहिम हे घरी आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.








