भुसावळातील साखळी उपोषणाला हिंदुस्तान मशीद ट्रस्टचाही पाठिंबा
आंदोलनात महिलांचाही सक्रिय सहभाग : सायंकाळपासून संविधान रक्षकांचे रणे आंदोलन
भुसावल : एनपीआर व एनआरसी कायदा रद्द करावा तसेच सीएए कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी भुसावळातील संविधा बचावो समितीतर्फे गेल्या दहा दिवसांपासून तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू आहे. शनिवारी य उपोषणाला शहरातील हिंदुस्तान मशीद ट्रस्टने पाठिंबा दर्शवत तहसील प्रशासनाला पत्र दिले. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी आठ दरम्यान संविधान रक्षकांतर्फे धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे.
साखळी उपोषणात महिलांचाही सक्रिय सहभाग
दहा दिवसीय साखळी उपोषणात शनिवारी शहरातील मुस्लीम समाजातील महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. हिंदुस्तानी मस्जीद ट्रस्ट, नसरवांजी फाईलतर्फे साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यात आला तसेच तहसील प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी मौलवी अनिस कासमी, मो.ग्यासुद्दीन, हिन्दुस्तानी मस्जीदचेे प्रमुख ट्रस्टी अकबर भाई, शे. जाफर, मो.मुन्वर खान, रफीक पहेलवान, मेहमूदभाई बिहारी, असलम खान, नावेद पहेलवान, आबीद भाई, शे.शाहीद, ईब्राहीम ऊर्फ राजा, अशरफ कुरेशी, रहिम कुरेशी, मेहेबुब खान, शे.ईम्रान, अबरार, सलीम भाई, रहीम अली, जाफक मेहेबुब, रफीक, शाहिद कासम, व महीला मध्ये सायरा बानो मुनंव्वर खान, शमीम कुरेशी, सासमीन कुरेशी, नसरीन शेख, मेहरुन, हुरेन, मुस्कान, जुबी तडवी, शकीला, बदरुन, रईसा रहिम कुरेशी, शाहीस्ता, माहीन, अलीश बा, शकीला, शबीना, सईदा कुरेशी नसीम यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सायंकाळपासून ‘एक रात्र संविधानासाठी’
साखळी उपोषणासोबतच शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते 26 जानेवारीच्या सकाळच्या आठ वाजेपर्यंत रात्रभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदेालनात ‘जश्ने ए संविधान’ असे नाव सुद्धा देण्यात आलेे आहे.
या आंदोलनात समितीचे सर्व सदस्य, भुसावळ शहरातील सर्व जागृक नागरीक, काही उर्दू कवी सुद्धा सहभागी होणार आहेत. आंदोलन यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष सलीमशेठ चुडीवाले, समितीचे सचिव फिरोज शेख, उपाध्यक्ष मुन्वर खान, सहसचिव युनूस मामा, खजांची साबीर शेख, सह खजांची अशरफ कुरेशी, सदस्य जुनेद खान, मोहम्मद आबीद, दानिश पटेल, फुरकान शेख, साजीद बागवान, अजहर चॅम्पियन, मजहर चॅम्पियन, वासीक शेख, डॉ. इमरान खान, रऊफ युसूफ आदी झटत आहेत. अशरफ खान, तसलीम खान, अबरार ठाकरे, रहिम कुरेशी आदी मार्गदर्शन करणार आहेत.
