विरावली शेत शिवारातील विहिरीत अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळला
The dead body of an unidentified youth was found in a well in Viravali Shet Shiwar यावल : शहरालगतच्या विरावली शिवारातील विहिरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला असून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले. मृतदेह कुजलेल्या असवस्थेत असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले.
ओळख पटवण्याचे यंत्रणेचे आवाहन
यावल शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर चोपडा मार्गावरील दरबारसिंग शांताराम पाटील यांच्या विरावली शिवारातील शेत गट क्रमांक 175 मध्ये विहिर आहे. या विहिरीतून शनिवारी दुर्गंधी येत असल्याने शेतमजुरांनी विहिरीत डोकावुन पाहिले तेव्हा विहिरीत सुमारे 30 ते 35 वर्ष वयाचा अज्ञात तरूणाचा मृतदेह दिसुन आला तेव्हा तातळीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश दहिफडे, पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी, भूषण चव्हाण, विनोद चौधरी दाखल झाले. त्यांनी नागरीकांच्या मदतीने या अज्ञात तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप तरुणाची ओळख पटलेली नाही. तर घटनास्थळीच मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात नोंद करण्यात आली.








