कानपूरच्या ट्रक चालकाचा भुसावळात ट्रकच्या कॅबीनमध्येच मृत्यू


A truck driver from Kanpur died in the cabin of the truck in Bhusawal भुसावळ : युपीतील कानपूर जिल्ह्यातील ट्रक चालकाचा वाहनाच्या कॅबीनमध्येच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. हृदयविकाराने मध्यरात्री ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा अंदाज
ग्यानेंद्रकुमार जयनारायण कुशवाह (48, रा.495, सयोदरी पटरसा, घाटमपूर, कानपूर, उत्तरप्रदेश) असे मयत ट्रक चालकाचे नाव आहे. भुसावळ तालुका कृषी कार्यालयाजवळील माऊली हॉटेलसमोर कुशवाह यांनी आपली ट्रक (जी.जी.23 डब्ल्यू.3098) उभी केली व ते ट्रकच्या कॅबीनमध्येच शनिवारी मध्यरात्री झोपले होते. रविवारी सकाळी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. तपास शहरचे सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !