भाव ते साक्षात्कार म्हणजे माँ नर्मदा परिक्रमा : डॉ.नितु पाटील


भुसावळ : भाव असेल तर भक्ती दिसेल, भक्ती असेल तर समर्पण राहिल आणि समर्पण हेच साक्षात्कारचे मार्ग उघडते याची अनुभूती माँ नर्मदा परीक्रमा करतांना येते, असे विचार परीक्रमावासी डॉ. नितु पाटील यांनी वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघाच्या कार्यक्रमात केले. शहरातील रींग रोड जवळील योग केंद्रात वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघातर्फे डॉ.नितु पाटील यांचा सत्कार आणि माँ नर्मदा परीक्रमा अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अध्यक्षस्थानी प्रा.व.पु.होले, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष धनराज पाटील, सचिव प्रभाकर झांबरे, युवा नेते विशाल जंगले उपस्थित होते. ज्योती चौधरी यांनी माँ नर्मदा अष्टक म्हटले. पुरुषोत्तम मास सुरू असल्याने भगवतगीतेचा 15 वा अध्याय प्रकाश पाटील यांनी म्हटला. डॉ.नितु पाटील यांचे आईवडील तुकाराम पाटील व वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माँ नर्मदा परिक्रमा 108 दिवसांतच का पूर्ण झाली, याबाबत डॉ. पाटील यांनी अध्यात्मिक महत्त्व सांगितले तसेच विविध अनुभव कथन केले. प्रा.व.पु.होले यांनी येष्ठ नागरीक यांच्याशी संवाद साधला. वासुदेव जेष्ठ नागरिक संघात नवीन सभासद झालेल्या सर्व नागरीकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक धनराज पाटील तर मनोगत ललिता टोके, प्रभाकर झांबरे, लोटू फिरके तर सूत्रसंचालन प्रा.प्रकाश पाटील तसेच आभार भरती बेंडाळे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !