भुसावळ बसस्थानकातून सेवानिवृत्ताचे नऊ हजार लांबवले


9,000 of the pensioner was extended from Bhusawal bus stand भुसावळ : बसस्थानकात चोरट्यांनी डेरा जमवला असून सातत्याने होणार्‍या चोर्‍यांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. बसच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील सेवानिवृत्ताचे भामट्यांनी नऊ हजार लांबवल्याची घटना 3 रोजी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल
पंढरीनाथ लक्ष्मण बाविस्कर (77, देना नगर, भुसावळ) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून 3 रोजी सकाळी ते बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत असताना भामट्यांनी त्यांच्या खिशातील नऊ हजारांची रोकड लांबवली. बाविस्कर यांनी याप्रकरणी सोमवारी दुपारी तीन वाजता याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रवींद्र भावसार करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !