भुसावळ शहरात भाजपाने केले शहिदांना वंदन

मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत माजी सैनिक व वीरपत्नींचा केला सत्कार.


भुसावळ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे जुना सातारा येथील शहिद स्व.नरेंद्र महाजन शहिद स्मारक येथे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. यावेळी देशासाठी बलिदान देणार्‍या शहिद सैनिकांच्या वीर पत्नींचा व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यां सोबतच उपस्थित स्थानिक नागरिकांना शहीद स्मारकाची पवित्र माती हातात घेऊन विकसीत भारत निर्माण करण्यासाठी पंचप्रणाची सामूहिक शपथ देण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, माजी नगरसेवक मुकेश पाटील, सतीश सपकाळे, लक्ष्मण सोयंके, पवन बुंदेले, गुणवंत बोरोले, महिला मोर्चा शहराध्यक्ष अनिता आंबेकर, सरचिटणीस वैशाली सैतवाल, योगीता ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, अनुसूचित जाती मोर्चाचे राहुल तायडे, किसान मोर्चाचे कैलास झोपे, माजी सैनिक आघाडीचे लक्ष्मण बेंडाळे, प्रशांत देवकर, प्रमोद पाटील, शंकर शेळके, जयंत माहुरकर, प्रा.विलास अवचार, मनोज पिंपळे, गौरव लोणारी, शिशिर जावळे, चंद्रशेखर पाटील, श्रेयस इंगळे संजय बोचरे, अमोल पाटील, सागर अग्रवाल, चेतन सावकारे, वैभव लोणारी, चेतन बोरोले, महेंद्र पाटील, योगेश पाटील, बापू चौधरी, गौरव कोळी, सागर चौधरी, गोपीसिंह राजपूत, संतोष ठोकळ, मयूर सावकारे, विजय डोंगरे,प्रशांत भट, सागर जाधव,रेहमान शेख यांच्यासह परीसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सूत्रसंचालन शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे यांनी केले.

या वीरपत्नी व माजी सैनिकांचा झाला सत्कार
या कार्यक्रमात वीरपत्नी अर्चना नरेंद्र महाजन, फरीदाबी शेख, भारती कोल्हे, माजी सैनिक हवालदार ज्ञानेश्वर मोंडाळे, माजी सैनिक हवालदार हिरालाल निकम, माजी सैनिक नायक महेंद्र पाटील, माजी सैनिक दिलीप पाटील, माजी सैनिक लक्ष्मण बेंडाळे, माजी सैनिक अनिल कुलकर्णी आदींचा सत्कार करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !