भुसावळात अल्पवयीन तरुण-तरुणी रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात
Minors in custody of Railway Security Force in Bhusawal भुसावळ : अल्पवयीन तरुण-तरुणी रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रेल्वे सुरक्षा बलाने त्यांना ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले. मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील विजय राघव गढ (खलवारा) येथील 17 वर्षीय मुलगी व 16 वर्षाचा मुलगा शाळेतून कोणालाही काहीही न सांगता रेल्वेतून पसार होताना भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेत समतोल प्रकल्पाच्या स्वाधीन करण्यात आली. ही घटना गुरूवारी घडली.
शाळेच्या ड्रेसवरच बाहेर पडली विद्यार्थिनी
दोघांनी मित्र असल्याचे सांगत आम्ही शाळेत कोणालाही काही न सांगता तेथून निघून आल्याचे सांगत सुरतला जात असल्याची कबुली दिली. आरपीएफ कुशवाह यांनी उपनिरीक्षक ए.के. तिवारी यांना माहिती दिली. तिवारी यांनी एनजीओ प्रतिभा महाजन व दीपक पाचपांडे यांच्याकडे दोघांना सोपवले.








