भुसावळकरांना आजपासून सुरळीत पाणीपुरवठा


Smooth water supply to Bhusawalkar from today भुसावळ : रॉ वॉटरसाठी वापरण्यात येणारी सिमेंट पाईप लाईन लिकेज झाल्यानंतर बुधवारी पाण्याची उचल थांबवण्यात आली व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर आता शहरवासीयांना शुक्रवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

लिकेज दुरुस्तीने थांबली पाण्याची गळती
दरम्यान, लिकेज दुरुस्तीच्या माध्यमातून सुमारे 50 हजार लीटर वाहून जाण्याचा प्रकारही आता थांबाला आहे. तापी पात्रातील पालिकेच्या रॉ वॉटर पंपाजवळून पाण्याची उचल करताना वापरण्यात येणार्‍या सिमेंट पाईप लाईनला लिकेज असल्याने दररोज सुमारे 50 हजाराहून अधिक लीटर पाणी वाया जात होते शिवाय त्यामुळे पाणी उचल करण्यास दिरंगाई होत असल्याने त्याचा परीणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत होता. गुरुवारी पाईप लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लिकेज असलेल्या दोन व्हॉल्व्हची दुरुस्तीही करण्यात आल्याने शुक्रवारपासून शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्याची आशा आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !