रावेर बसस्थानकात वयोवृद्धेला बोलण्यात गुंतवून चार ग्रॅमची पोत लांबवली


At the Raver bus station, the old man was engaged in talking and extended the texture of four grams रावेर : रावेर बस स्थानकातून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला भूलथापा देवून 4 ग्रॅमची सोन्याची पोत घेऊन भामट्याने पलायन केले. ही घटना सोमवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
वसंताबाई रामदास पानपाटील (70, धाबेपिंप्री, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात 40 ते 45 वर्षीय अनोळखी बाईने वसंताबाई यांच्यासोबत जवळच्या नातेवाईकांची ओळख दाखवून गप्पा गोष्टी सुरू केल्या. मी वयोवृद्ध माणसांसाठी पगार सुरू होण्यासाठी शासनाच्या नवीन योजनेचा लाभ मिळवून देते, असे सांगून पगार सुरू करण्याची बतावणी केली. यानंतर माझी सोन्याची माळ घरी राहून गेली आहे. तहसील कार्यालयात मंगळसूत्र घातलेला फोटो लागतो. त्यामुळे तुम्ही मला थोड्या वेळीपुरती तुमच्या गळ्यातील माळ द्या, असे भूलथाप देवून वसंताबाई यांच्या गळ्यात घातलेली चार ग्रॅम सोन्याची सोन्याची पोत व आधारकार्ड घेऊन मी तहसील कार्यालयात जावुन येते असे सांगून पोबारा केला. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल शेख हे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !