शेतीकामासाठी गेलेल्या नीमच्या तरुणाचा झोपेतच मृत्यू


A young man from Neem, who went to work in agriculture, died in his sleep अमळनेर : शेतात निंदणीसाठी गेलेल्या तालुक्यातील निम येथील 33 वर्षीय विवाहित तरुणाचा शेतात झोपेतच मृत्यू झाला. वासुदेव रामसिंग पाटील उर्फ लोटन (33) असे मयत तरुणाचे नाव आहे.

झोपेतच झाला मृत्यू
निम येथील वासुदेव पाटील (33) हा आई वडिलांसह कळमसरे रस्त्यावरील शेतात निंदणीसाठी गेला होता. दुपारी त्याचे आई वडील घरी आले. मात्र तो निंदणी कामासाठी शेतातच थांबून होता. साडेचार वाजले तरी वासुदेव परत आला नाही, म्हणून त्याची आई त्याला पाहण्यासाठी गेली असता तो शेतातील झाडाखाली झोपलेला आढळून आला.







आईने त्याला उठवले असता तो उठत नसल्याने त्याला आजूबाजूच्या शेतकर्‍यांना बोलावून गाडीत टाकून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व पाच वर्षांचा मुलगा असा परीवार आहे. रणछोड पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहेत. दरम्यान, अद्याप मृत्यूचे नेमकं कारण समजून आलेले नाही.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !