भुसावळात चॉकलेटआड गुटखा तस्करीचा डाव पोलिसांनी उधळला
50 लाखांच्या गुटख्यासह इंदौरचा चालक जाळ्यात : बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
The police foiled a plot to smuggle gutkha under the guise of chocolate in Bhusawal भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुटख्याची होणारी तस्करी रोखत सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त केल्याने जिल्ह्यातील गुटखा तस्कर हादरले आहेत. विशेष म्हणजे कंटनेरमध्ये सुरूवातील लहान मुलांचे चॉकलेट व जेम्सचे खोके रचून त्याआड गुटख्याची तस्करी केली जात होत होती. याप्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात कंटेनर चालक जगदीश श्रीवास्तव (48, इंदौर) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिसांनी कंटेनर (क्रमांक यु.पी.78 सी.एन.5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी लावली. रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुलीजवळ कंटेनर आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्यास चॉकलेट बॉक्सच्या आड राजनिवास मानमसाल्याची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कंटेनर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात लावण्यात आला. अन्न व सुरक्षा विभागाला पत्र दिल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी न आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली.






यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, डीबी पथकातील सुनील जोशी, निलेश चौधरी, हेमा पानपाटील, रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार, यासीन पिंजारी आदींच्या पथकाने केली.


