महर्षि व्यास नगरीतील 14 मंदिरात लागू होणार वस्त्रसंहिता


Dress code to be implemented in 14 temples of Maharishi Vyas Nagari फैजपूर : महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महर्षि व्यास नगरी, यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले. प्रास्ताविक सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिराचे सचिव तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नीळकंठ चौधरी यांनी केले. ‘मंदिरात वस्त्रसंहितेची आवश्यकता’ या विषयावर सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी तर ‘मंदिर संस्कृती रक्षणाची आवश्यकता’ या विषयावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. वस्त्रसंहिता लागू करण्याच्या विषयानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या 14 मंदिरांच्या विश्वस्तांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागु करण्याचा निर्णय सांगितला. या बैठकीला तालुक्यातील 35 हून अधिक मंदिरांचे मंदिर विश्वस्त उपस्थित होते.

महर्षि व्यास मंदिराचे अध्यक्ष प्रमोद गडे आणि त्यांचे सर्व विश्वस्त सहकारी यांच्या साहाय्याने मंदिराच्या सभागृहात शुक्रवार, 18 ऑगस्ट या दिवशी यावल तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. फैजपूर, हिंगोणा, हंबर्डी, बामणोद, चुंचाळे, दहिगाव, आमोदा आदी तालुक्यातील विविध गावांतून मंदिर विश्वस्त या बैठकीला उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !