कर्तव्याशी बांधिलकी राखत जलदगतीने गुन्ह्यांचा निपटारा : भुसावळ पोलीस दलातील शिलेदारांचा सहृदय सन्मान


Fast disposal of crimes while maintaining commitment to duty: Honorable tribute to Shiledars of Bhusawal Police Force भुसावळ : पोलीस दलाने नेमलेले कार्य वेळेत प्रामाणिपकपणे पूर्ण करून पोलीस स्टेशन एम्लाई ऑफ द मंथ पुरस्कार पटकावणार्‍या पाच शिलेदारांचो भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी नुकताच सहृदय सन्मान केला. नूतन उपअधीक्षक पिंगळे यांनी भुसावळ विभागाचा पदभार घेतल्यानंतर ‘पोलीस स्टेशन एम्प्लाई ऑफ द मंथ’ ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार दर महिन्याला उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडून या कर्मचार्‍यांना प्रत्येक एक हजार रुपये रीवॉर्डही दिला जात आहे. मानकर्‍यांचा एकत्रीत फोटो डीवायएसपी कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात येत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये कामाचा उत्साह दुणावला आहे.

पुरस्काराने कर्मचार्‍यांना कामाला अधिक प्रेरणा
पोलीस उपअधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पाचही कर्मचार्‍यांचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली तसेच त्यांना रीवॉर्ड देवून अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गौरवल्यानंतर अन्य कर्मचार्‍यांचादेखील कामाप्रती हुरूप वाढला. अन्य कर्मचारीदेखील या कामाची प्रेरणा घेवून आता शासकीय काम जलदगतीने करतील, अशी आशा पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांनी यावेळी व्यक्त केली.

या कर्मचार्‍यांचा झाला सन्मान
भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अनिल शिवाजी चौधरी, भुसावळ बाजारपेठचे हवालदार उमाकांत पन्नालाल पाटील, भुसावळ तालुक्याचे रशीद मुबारक तडवी, नशिराबादच्या महिला हवालदार लीना मधुकर लोखंडे, भुसावळ शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक प्रमोद गोपाळ लोणे यांचा सन्मान करण्यात आला. या कर्मचार्‍यांनी अनुक्रमे क्राईम कामकाज अद्यावत करून गुन्ह्यांची निर्गती करण्यासह घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे, सीसीटीएनमध्ये उत्कृष्ट काम करणे, शहर वाहतूक शाखेचे कामकाज उत्कृष्टपणे सांभाळल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !