भुसावळातील प्रख्यात डॉ.निलेश महाजन यांच्या उपक्रमाचे जिल्हाधिकार्‍यांकडून कौतुक


भुसावळ : शहरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.निलेश महाजन यांच्या साईपुष्प रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. प्रसंगी डॉ.महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणीदेखील करीत रुग्णांशी संवाद साधला. डॉ.महाजन यांनी रुग्णालयातर्फे पुरवल्या जाणार्‍या विविध सुविधांसह योजनांची माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तत्पूर्वी यावल तालुक्यातील पिळोदा येथील डॉ.महाजन यांच्या पॉलिहाऊसचीदेखील जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !