जळगावातून साडेसात लाखांचा ट्रक लांबवणारे चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Thieves who stole a truck worth seven lakhs under Jalgaon in the net of MIDC police ळगाव : जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रत्नाकर नर्सरी येथून पार्कींगला लावलेला साडेसात लाख रुपये किंमतीचा ट्रक चोरीप्रकरणी धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी संशयिताना पकडल्यानंतर त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरूवार, 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ही कारवाई करण्यात आली. संशयिताना न्यायालयानपे 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
मेहरूण परीसरातील राहणारे वसीम अहमद सुलतान अहमद याच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.5310) हा राष्ट्रीय महामार्गावरल विशाल पेट्रोल पंपानजीकच्या रत्नाकर नर्सरीजवळ पार्कींगला लावलेला होता. मंगळवार, 29 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री चोरट्यांनी हा ट्रक चोरून नेला होता. याप्रकरणी बुधवार, 30 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा ट्रक धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी पकडत नवाज सादीक सैय्यद (31, तांबापुरा जळगाव), शहजाद रशीद शेख (22, रा.रामरहिम कॉलनीजवळ, मध्यप्रदेश) आणि आवेजखान जहागीरखान (21, रा.नशिराबाद, जळगाव) या तिघांना अटक केली होती व एमआयडीसी पोलिसांना सूचित केले होते. एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी सकाळी 11 वाजता तिघांना ताब्यात घेत जळगाव जिल्हा न्यायालयातील सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता तिघांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.







यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोस्टेचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, जमील शेख, सुधीर साळवे, निलोफर सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धीरज महाजन, हवालदार एस.सी. पाथरवट, ए.व्ही वाघ आदींनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !