जळगाव जिल्ह्यात बनावट हातभट्टी बनवणारे दोघे स्थानबद्ध : जळगाव जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने गुन्हेगार हादरले
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 32 संशयितांविरोधात एमपीडीएची कारवाई
Two makers of fake hand furnaces arrested in Jalgaon district: Criminals shaken by order of Jalgaon District Collector जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांसह अवैध व्यवसायीक तसेच हातभट्टी चालकांविरोधात पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात असताना आता पुन्हा बनावट अवैध दारू बनवणार्या तसेच अवैधरीत्या गावठी दारू बनवणार्या दोघांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगार हादरले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 32 संशयिताविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाणे आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वास अरूण गारूंगे (42, रा. समता नगर, जळगाव) आणि समाधान लोटन चौधरी (36, राजीव गांधी नगर, पारोळा) अशी स्थानबद्ध झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली.
कारवाईने गुन्हेगार हादरले
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार परीसरात अवैधरित्या गावठी दारून बनविणे व त्याची विक्री करणे व शासनाच्या आदेशाने उल्लंघन करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकुण 18 गुन्हे रामानंद नगर पोलीसात दाखल आहे. शिवाय त्याच्यावर या आधी चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली परंतू त्याच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अहवाल तयार करून जिल्हा मुख्यालयात पाठविला.






पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा समाधान लोटन चौधरी यांच्या विरोधात वेगवेगळ्या स्वरूपाचे 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात अवैध दारू विक्री, गावठी दारू बनविणे, फसवणूक, चोरी, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे, स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे, हाणामारी असे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर योग्य आळा घालण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी देखील याचा स्थानबध्द करण्याचा अहवाल पोलीस मुख्यालयात पाठविला. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दोन्ही प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आलेल्या प्रस्तावानुसार अरूण गारूंगे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर दुसरा गुन्हेगार समाधान चौधरी याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले.


