दुचाकी विक्रीच्या बहाण्याने वयोवृद्धाची पावणेदोन लाखांची फसवणूक
Fraud of 2 lakhs by an elderly man on the pretext of selling a two-wheeler जळगाव : दुचाकी विक्री करण्याच्या बहाणा करून एका 61 वर्षीय वृध्दाची 1 लाख 66 हजार 111 रूपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुरूवार 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता तीन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच दोघांना घेतले ताब्यात
चंद्रकांत सदाशीव इसे (61) हे आपल्या परीवारासह खोटे नगर परीसरात वास्तव्याला आहे. त्यांना दोन मोपेड दुचाकी घ्यायच्या असल्याने त्यांनी दीपक उर्फ मनोज हिरालाल कोळी (कांचन नगर, जळगाव) आणि सुमित राजू सपकाळे (पांझरापोळ, जळगाव) यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी टॉवर टॉकीत दत्त शोरूमचे मालक यांच्याशी संपर्क साधून एक लाख 66 हजार 111 रुपये स्वीकारले मात्र दुचाकी दिली तसेच घेतलेले पैसे परत केले नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रकांत इसे यांनी गुरूवार, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मनोज कोळी, सुमित सपकाळे आणि दत्त शोरूमचे मालक यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमित सपकाळे आणि मनोज कोळी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरासागर करीत आहे.








