मराठा समाजावर लाठीहल्ला : रावेरात रास्ता रोको


Lathi attack on Maratha community: Stop the road to Raver रावेर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सराटी, ता.अंबड येथे पाच दिवसांपासून शांततेत उपोषण करणार्‍या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट व अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेध मराठा समाजाने रावेर तालुक्यात करीत शहरातील बर्‍हाणपूर-अंकलेश्र्वर महामार्गावर मराठा समाजाने रास्ता रोको करीत आंदोलन केले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवण्यात आला.

तहसीलदारांना दिले निवेदन
रावेर शहरातून गेलेल्या अंकलेशवर-बर्‍हाणपूर महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा समाजातर्फे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी सुरेश चिंधू पाटील, घनशाम पाटील, प्रशांत पाटील, संतोष पाटील, मराठा समाज विकास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.एस.आर.पाटील, वामनराव पाटील, दिलीप पाटील, बाजार समिती संचालक गणेश महाजन, पीपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, राजेंद्र चौधरी, ललित चौधरी, स्वप्नील पाटील शरद राजपूत यांच्यासह मराठा समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार बंडू कापसे यांना यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, फौजदार दीपाली पाटील, राजेंद्र करोडपती आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !