जीएसटी अधिकार्यांसोबत चालक म्हणून राहताना शिकला बनवा-बनवी : जळगावात व्यापार्यांना संशय येताच पडल्या बेड्या
Living with GST officials as drivers, learn and make: In Jalgaon, traders fell off the shackles as soon as they became suspicious. जळगाव : जीएसटी अधिकार्याकडे चालक म्हणून असताना देहबोलीचे अनुसरून करून त्याने जळगावातील व्यापार्यांना गंडवायचे ठरवले मात्र व्यापार्याला संशय येताच तोतया अधिकार्याला बेड्या बेड्या पडल्या. एमआयडीसी मधील उद्योजकांकडे लाखो रुपयांची मागणी करणार्या तोतया अधिकारी भाऊसाहेब ठाकरे याला एमआयडीसीतील अशोक ट्रेडर्स कंपनीतून अटक करण्यात आली. संशयिताला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कारवाईची पद्धत जाणताच अनेकांना गंडवले
जीएसटी अधिकार्यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारा भाऊसाहेब ठाकरे हा अधिकार्यांसारखे राहत व बोलत सर्व बनवाबनवी शिकला व त्यातूनच तो जीएसटी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पोहचू लागल्याचे पोलीस तपासात समोर आले. जीएसटी विभागाचे अधिकारी कारवाईसाठी जात असताना भाडेतत्वावर वाहने घेऊन जातात. त्या वाहनांवर भाऊसाहेब ठाकरे हा चालक होता. अधिकारी कोणत्या ठिकाणी जातात, कोणाला भेटतात, त्यांच्या कारवाईची, माहिती घेण्याची तसेच कागदपत्रे तपासणीची पद्धत कशी आहे, हे सर्व ठाकरे याने हेरले. त्यातून तो मग तोतयागिरी करू लागला.






व्यापार्याला संशय येताच फुटले बिंग
अशाच प्रकारे त्याने जळगाव औद्योगिक वसाहत परीसरात अनेक उद्योजकांकडे जाऊन धमकावले. असाच प्रकार शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू असताना उद्योजकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


