पाचोरा शहरातील अल्पवयीन बालिकेवर परीचीत तरुणाकडूनच अत्याचार
A minor girl was molested by a stranger in Pachora city पाचोरा : शहरातील एका भागातील नऊ वर्षीय बालिकेवर नात्यातीलच 18 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना संतापनजक घटना रविवार, 3 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अल्पवयीन पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीअंती गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली.
नातलगांकडे पीडीतेला ठेवल्यानंतर केला अत्याचार
नऊ वर्षीय बालिकेचे आई-वडील बाहेरगावी गेल्याने बालिकेस याच परीसरात राहणार्या आपल्या नातलगांकडे ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी बालिका व तिचा नातलग असलेला युवक घरात एकटे असल्याने त्याचा फायदा घेऊन बालिकेवर अतिप्रसंग करण्यात आला. भयभीत झालेल्या बालिकेने आपबिती सांगितल्यानंतर सायंकाळी पोलिसात पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक रकण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.








