धरणगावात चोरटे सुसाट : बंद घरासह कापड दुकान फोडले


Thieves on the move in Dharangaon : A cloth shop was broken into with a locked house धरणगाव : सुसाट चोरट्यांनी शहरात दोन ठिकाणी चोर्‍या केल्याने व्यापार्‍यांसह नागरीक धास्तावले आहेत. शहरातील मुख्य बाजार पेठेतील कापड दुकान आणि गुजराथी गल्लीतील एक बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी रोकड, चांदीचा क्वाईन, असा साधारण 50 हजाराहून अधिकचा ऐवज लंपास केल्याने शहात खळबळ उडाली आहे.

व्यापारी धास्तावले
तोंडावर मास्क आणि एकाने रुमाल बांधलेला अशा दोघा चोरट्यांनी धरणगावातील मुख्य बाजार पेठेतील मिश्रीलाल लालचंद कापड दुकान सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास फोडले. दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात गल्ल्यातील साधारण 15 ते 20 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला तर गुजराथी गल्लीतील शाम कर्वा हे बाहेर गावी गेले असल्याने घर बंद होते. चोरट्यांनी बंद घर फोडून साधारण 35 हजारांची रोकड आणि एक चांदीचा क्वाईन, असा साधारण 50 हजारांहून अधिकचा ऐवज चोरीला गेला आहे. दरम्यान, भावे गल्ली आणि गुजराती गल्ली परीसरातील बंद घरं देखील फोडण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्यासह कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !