कांचन नगरात तरुणावर चॉपर हल्ला : त्रिकूट जाळ्यात
Chopper attack on youth in Kanchan Nagar : Three in a trap जळगाव : जळगावातील कांचन नगरात जुन्या वादानंतर तरुणावर त्रिकूटाने चॉपर हल्ला केला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्ह्यातील त्रिकूटाला शनिपेठ पोलिसांनी अटक केली.
असे आहे हल्ला प्रकरण
जळगाव शहरातील डीएनसी महाविद्यालयाजवळ पवन अशोक कोळी (30, रा. डीएमसी कॉलेज, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पवन हा कांचन नगर परीसरातील कालंका माता मंदिराजवळ चिकन घेण्यासाठी दुचाकीने जात असताना संशयित आरोपी गोपाल इंदल कोळी, रोहित साईनाथ कोळी, योगेश घनश्याम कोळी (सर्व रा. कांचन नगर, जळगावम) या तिघांनी पवनचा रस्ता अडविला आणि जुन्या वादातून त्याला मारहाण केली. त्यानंतर गोपाल इंदल याने चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या पवनला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.






त्रिकूटाला गुन्हा दाखल होताच बेड्या
यावेळी वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी पवन कोळी याचे काका सुनील बाबुराव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोपाल इंदल कोळी, रोहित साईनाथ कोळी, योगेश घनश्याम कोळी तिघे रा. कांचन नगर, जळगाव या तिघांविरोधात रात्री उशिरा शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शनीपेठ पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत तीनही संशयित आरोपींना रात्री उशीरा अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.


