पाच हजारांची लाच भोवली : जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह दोघे जाळ्यात


5000 brib : Vasantrao Naik of Jalgaon along with district manager of Bhatke Vimukt Jati Corporation arrested जळगाव : शेळी पालनासाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भीभमराव लहू नाईक (55) व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल (34) यांना जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच मंगळवारी दुपारी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकण
बोरावल, ता.यावल येथील 42 वर्षीय तक्रारदाराने जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या कार्यालयाकडे शेळी पालन साठी एक लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण दाखल केले. त्यापैकी पहिला हप्ता 75 हजार रुपयांचा मंजूर झाला व उर्वरीत 25 हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक यांनी स्वतःसाठी तीन हजार व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल यांच्यासाठी दोन हजारांची लाच सोमवारी मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला व कार्यालयातच संशयितांना लाच घेताच अटक करण्यात आली. संशयितांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुनहा दाखल करण्यात आला.







यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकुर, राकेश दुसाने यांच्यासह पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !