जळगावातील बँकेतील तरुणीचा व्हिडिओ काढताच तरुणाला ‘पब्लिक मार’
The young man was ‘publicly beaten’ after taking a video of a young woman in a bank in Jalgaon. जळगाव : बँकेत कार्यरत तरुणीचा एका तरुणाने व्हिडिओ काढल्यानंतर भेदरलेल्या तरुणीने कुटूबियांना माहिती दिली. पाहता-पाहता जमाव जमल्यानंतर तरुणाला पब्लिक मार देत शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. बुधवारी दुपारी उघडकीस आला. शौकत अली अब्दुल गफार शख (वय- 42, रा. कासमवाडी, ह. मु. जिल्हापेठ) असे संशयित तरुणाचे नाव आहे.
आधी केली तक्रार नंतर काढला व्हिडिओ
शहरातील एका भागात तरुणी वास्तव्यास असून ती गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एका बँकेत नोकरीला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास तरुणी बँकेत काम करीत असतांना शौकतअली अब्दुल गफ्फार शेख हा त्याठिकाणी आला. त्याने बँक खात्यातून वर्ग केलेले पैसे समोरच्या पार्टीला मिळाले नसल्याची तक्रार बँकेत उपस्थित असलेल्या तरुणीकडे केली. तरुणीने त्या इसमाची तक्रार त्यांचा सेल्स ऑफिसर असलेला सहकारी वसीम बागवान याच्याकडे वर्ग केली. शौकतअली हा इसम वसीम बागवान याच्याशी बोलत असतांनाच त्याने मोबाईलचा कॅमेरा सुरू करीत तरुणीचा व्हीडीओ तयार केला. घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती आपल्या भावाला दिली. त्यानुसार तरुणीचा भाऊ आणि त्याचे मित्र बँकेत आले.






अखेर तरुणाविरोधात गुन्हा दाखल
तरुणीने शौकतअली हा विनाकारण त्रास देत असल्याचे सांगितल्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याची जोरदार धुलाई केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी गजानन बडगुजर हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या तावडीतून शौकत अली याची सुटका करीत त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन शौकतअली अब्दुल गफ्फार शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयिताचा व्हिडीओ तयार करण्याचा उद्देश काय होता ? व्हिडीओ पाठवला ती महिला कोण? याबाबतची माहिती पोलीस तपासात समोर येणार आहे.


