अमळनेरात प्रवासी रीक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू


A woman died after a passenger rickshaw overturned in Amalner अमळनेर : अमळनेर शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या वळणावर प्रवासी रीक्षा उलटून झालेल्या अपघातात कोंढवळच्या महिला प्रवाशाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात प्रवासी रीक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.







असा घडला अपघात
अमळनेर तालुक्यातील कोंढवळ येथील रहिवाशी कलाबाई बुधा पाटील (58) या आपल्या परीवारासह वास्तव्याला होत्या. बुधवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता कलाबाई पाटील या कामानिमित्ताने खाजगी प्रवासी रीक्षाने अमळनेर येथून आपल्या गावी जात असताना अमळनेर बसस्थानकात जवळील वळणावर प्रवासी रीक्षावरील चालक राजेंद्र रामदास भील याचा ताबा सुटल्याने वाहन उलटले. या अपघातात कलाबाई पाटील खाली फेकल्या गेल्या. त्यातच ही रीक्षा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या दबल्या जावून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान मयत महिलेचा पुतण्या योगेश रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रीक्षा चालक राजेंद्र रामदास भिल यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पतपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !