15 हजारांची लाच भोवली : सावरगाव मंडळाधिकार्यांसह दोघे एसीबीच्या जाळ्यात
ACB Trap Sawagaon Mandan Adhikari जळगाव : सातबारा उतार्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती नऊ हजार रुपये स्वीकारताना सावरगाव मंडळाधिकारी पांडुरंग हांडू कोळी यासह खाजगी विठोबा जयराम शिरसाठ (32, ठाणगाव, ता.येवला, जि.नाशिक) यास नाशिक एसीबीने गुरुवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्या आईचे नाव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडीलांच्या सातबारा उतार्यावर लावण्यासाठी मंडळाधिकारी पांडुरंग कोळी यांनी गुरुवारी 15 हजारांची लाच मागितली मात्र नऊ हजार रुपये देण्यावर तडजोड झाली तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली व खाजगी पंटराने लाच स्वीकारताच सायंकाळी दोघांना अटक करण्यात आली.








