अमळनेर तालुक्यातील शाळकरी मुलीचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा


Rape of school girl in Amalner taluka : Crime against both अमळनेर : अमळनेर तालुक्यातील एका गावातील शाळकरी मुलीला सायकलवर बसवून टेकडीवर नेत तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा संशयितांविरोधात गुन्हा
अमळनेर तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती अमळनेर येथील शाळेत शिक्षण घेते व अमळनेर शहरापर्यंत बसने प्रवास करते. शनिवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता पिडीत मुलगी ही अमळनेर बसस्थानकात बसची वाट बघत असतांना तिच्या ओळखीचे साहिल आणि भुर्‍या या दोन जणांनी तिला सायकलवर बसवून पिरबाबा टेकडीजवळ घेवून गेले. त्याठिकाणी एकांतात तिच्याशी अंगलट करून तिचा विनयभंग केला.







हा प्रकार घडल्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी साहित आणि भुर्‍या (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !