जळगावात ट्रक चालकाचा निर्घृण खून : तिसर्या आरोपीला मुक्ताईनगरातून अटक
Brutal murder of truck driver in Jalgaon : Third accused arrested from Muktainagar जळगाव : एमआयडीसीतील ट्रान्सपोर्टनगरात सागर रमेश पालवे (25, रा. मालदाभाडी, ता.जामनेर) या तरुणाची मुलीशी सतत बोलण्याच्या वादातून निघर्र्ूण हत्या करण्यात आली होती. तरुणाच्या खून प्रकरणी मयताची आई निलम रमेश पालवे (55) यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात पोलिसांनी दोन जणांना अटक केल्यानंतर तिसर्या संशयिताला मुक्ताईनगरातून अटक करण्यात आली. रतन पंडित माळी असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
मुलीशी बोलण्याच्या वादातून हत्या
सागर हा विदर्भ रोडलाईन्स याठिकाणी चालक म्हणून कार्यरत होता. गुरूवार, 7 रोजी तो या कार्यालयात थांबला होता. शुक्रवार, 8 रोजी सकाळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. त्याचा घातपात झाल्याची तक्रार निलम पालवे यांनी पोलिसात दिली. त्यानुसार ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे (40, रा.अष्टमी कॉलनी मुक्ताईनगर), निलेश रोहिदास गुळवे (22, रामेश्वर कॉलनी) यांना ताब्यात घेतले. सागर हा मुलीशी बोलतो या कारणावरून सागर सोबत काम करणार्या या दोघा साथीदारांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.








