धरणगाव पोलिसांची मोठी कामगिरी : दरोड्यापूर्वीच टोळीला ठोकल्या बेड्या
Big achievement of Dharangaon police : Gang was shackled before the robbery धरणगाव : धरणगाव पोलिसांनी मध्यप्रदेशातील टोळीला दरोड्यापूर्वीच जेरबंद केल्याने मोठी अप्रिय घटना टळली आहे. अटकेतील संशयित मध्य प्रदेशातील रहिवासी असून त्यांच्याकडून बोलेरो कारसह कुर्हाड, लोखंडी सळई, असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
संशय येताच आवळल्या मुसक्या
रविवार, 10 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 11 वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला पाळधी ते सावदा प्रचा शिवारात गावाचे अलीकडे सप्तशिंगी मातेच्या मंदीराजवळ बोलेरो (एम.पी.46 जी.1147) ही संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसल्यानंतर पथकाने तातडीने गाडीला घराला घातल्यानंतर गाडी काही संशयित तसेच दरोड्यासाठी लागणारी लोखंडी कुर्हाड, लोखंडी सळई, सुताचा दोर असे साहित्य मिळून आले. त्यानंतर पाच तरुणाची अंगझडती घेतली असता एकाच्या कमरेला एक धारदार पाते असलेला चाकू मिळून आला तसेच दुसर्या संशयिताकडे पँटच्या उजव्या खिशात प्लॅस्टीक पिशवीत लाल मिरचीची पावडर व कमरेला पेंचीस मिळून आली.






पाचही दरोडेखोरांना अटक
चौकशीदरम्यान संशयित अनिल लासग भिल (21, मोहाला पोस्ट चापोरा, ता.सेंधवा, जि.बडवाणी), नानुसिंग रूपसिंग बारेला (25, रजानेमल, ता.सेंधवा, जि.बडवाणी, चापोरा, ता.सेंधवा), जानमन रुमालसिंग बारेला (22, मोहाला, जि.बडवाणी), भाईदास पातलिया भिलाला (29, दिली, सेंधवा, जि.बडवाणी), हत्तर गनदा चव्हाण (भिलाला, 22, हिंदली, ता.सेंधवा, जि.बडवाणी) अशी अटकेतील संशयितांची नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ हे करीत आहेत.


