रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची : धुळे-दादर एक्सप्रेस आता दररोज धावणार !


Railway passengers, this news is very important for you: Dhule-Dadar Express will now run daily ! धुळे : धुळ्याहून थेट मुंबई जाण्यासाठी सोयीची असलेली दादर एक्स्प्रेस आता दररोज धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांची प्रचंड सोय झाली आहे. धुळे ते चाळीसगाव या पॅसेंजरच्या चार फेर्‍या दररोज होत असून रात्रीची एक फेरी वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार सुभाष भामरे यांनी दिली. धुळ्यातील एका कार्यक्रमात डॉ.भामरे यांनी ही माहिती दिली.

प्रवाशांना मोठी उपलब्धी
गाडी क्रमांक 01065 डाऊन दादर-धुळे एक्स्प्रेस ही दादरहून रविवार, सोमवार आणि शुक्रवार सायंकाळी 4:15 वाजता सुटते. धुळे स्थानकावर रात्री 11.:35 वाजता पोहोचते तर गाडी क्रमांक 01066 अप धुळे-दादर एक्स्प्रेस ही गाडी धुळे येथून सोमवार, मंगळवार व शनिवारी सकाळी 6:30 वाजता सुटते, तर दादर येथे दुपारी 1:15 वाजता पोहोचते. व्यापारी, नागरिकांना मुंबईत व्यापारानिमित्त तसेच मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी सोईची ठरते. ही एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावत होती व तिला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ती दैनंदिन सुरू होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !