यावलकरांची स्वच्छतेसाठी एकजूट : आवाहनाला प्रतिसाद


Yavalkars Unite for Cleanliness : Response to Appeal यावल : ‘मी यावलकर’ या शीर्षकाखाली यावल शहरातील बहुसंख्य तरुण मंडळीर्रीह एकत्र येत बुधवारी यावल स्मशानभूमीमध्ये श्रमदानात योगदान दिले. मी यावलकर या मंडळासह यावल नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यावल स्मशानभूमीत राबवण्यात आला.

आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
‘मी यावलकर’ या मंडळाच्या वतीने पराग सराफ यांनी श्रमदानसाठी आवाहन केले होते. स्मशानभूमी श्रमदानासाठी शहरातील प्रामुख्याने नवनाथ भक्त परीवार, प्रकाश गणेश मंडळ, विठ्ठलवाडी मित्र परीवार, रेणुका देवी परीसरातील तरुण, शिवतीर्थ मित्र परीवार, शहरातील डॉक्टर, मेडिकल असोसिएशनसह एक दिवस महाराजांसाठी संस्थेतील सभासद, वाणी गल्लीतील तरुण, धोबी वाडामधील तरुण, पंचवटी मित्र मंडळ तसेच यावल नगरपालिकेचे कर्मचारी यांनी मिळून साधारणता अडीच ते तीन तास श्रमदानाचे काम स्मशानभूमीत केले. यात नगरपालिकेच्या वतीने अभियंता सत्यम पाटील, दादू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका कर्मचार्‍यांनी देखील श्रमदानाचे काम केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !