बेकायदेशीर निविदेच्या अटी रद्द न केल्यास भुसावळात शिवसेना आंदोलन छेडणार : दीपक धांडे यांचा इशारा
Shiv Sena will stage agitation in Bhusawal if conditions of illegal tender are not cancelled: Deepak Dhande warns भुसावळ : भुसावळ नगरपालिकेने शहरातील विविध कामांबाबत प्रसिद्ध केलेल्या निविदेत सा.बां.विभागाने निर्देशित केलेल्या नियमांचे उल्लंघण केले असून मनमानी पद्धत्तीने अटी व शर्ती टाकण्यात आल्या असून त्या बदलण्यात न आल्यास शिवसेना उबाठा गट आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांनी दिला आहे.
खुली स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न
नियमाप्रमाणे 25 लाख ते एक कोटींची निविदा कमीत-कमी 21 दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिद्ध करता येते मात्र पालिकेने केवळ सात दिवसांचा कालावधी दिला आहे. 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध निविदेची अखेरची तारीख 4 ऑक्टोबर असून या दिवसांमध्ये 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी, 29 ला ईद, 30 रोजी शनिवार, 1 ऑक्टोंबरला व रविवार, 2 ऑक्टोंबरला गांधी जयंतीची सुटी आल्याने या दिवशी शासकीय कार्यालय व नगरपालिका बंद आहे. तब्बल पाच दिवस सुटी येत असतानाही केवळ खुली स्पर्धा टाळण्याच्या उद्देशाने हेतू पुरस्कर सात दिवसांचीच मुदत देण्यात आली आहे. या शिवाय अन्य नियम व अटीदेखील जाचक पद्धत्तीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

बेकायदेशीर अटी रद्द करण्याची मागणी
शासनाच्या नियमाप्रमाणे 10 लाखांच्या आतील कामासाठी कोणत्याही अनुभवाची व पात्रतेची गरज नसताना हेतू पुरस्कर ती अट टाकण्यात आली आहे. निविदेतील सर्व बेकायदेशीर अटी तत्काळ रद्द करण्यात याव्या अन्यथा शिवसेना प्रांत अधिकारी व मुख्याधिकारी यांना घेराव घालून याचा जाब विचारणार असल्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांनी दिला आहे.

