24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू : नांदेडच्या डीनविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा
24 patients died in 24 hours : Homicide case against Dean of Nanded नांदेड : नांदेड रुग्णालयाचे डीन डॉ.एस.आर.वाकोडे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघाले असतानाच आता डीन डॉ.वाकोडे यांच्याविरोधात रुग्णाचे नातेवाईक कामाजी टोम्पे यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने माय-लेकाचा मृत्यू
रुग्णाचे नातेवाईक कामाजी टोम्पे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नातेवाईक रुग्णालयात दाखल असताना बाहेरुन 45 हजारांहून अधिकची औषधी खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले तसेच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसे खर्च करण्यात आले होते. तरीही अधिष्ठाता डॉ. एस. आर.वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत त्यामुळे माय-लेकाचा मृत्यू झाल्याची तक्रार कामाजी टोम्पे यांनी केली आहे. त्यानुसार, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




आधी आईचा नंतर नवजात बाळाचा मृत्यू
दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातच आक्रोश केला.