ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा आरोप झाल्याने मंत्री गिरीश महाजनांची चौकशी करा : एकनाथराव खडसेंची मागणी


Investigate Minister Girish Mahajan for alleged links with drug mafia : Eknathrao Khadse’s demand जळगाव : शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केल्याने या आरोपाची चौकशी झाली पाहिजे व गंभीर आरोप झाल्यानंतर आता महाजनांनी नैतीकता समोर ठेवून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

मी राजीनामा दिला मग महाजनांचा का नाही ?
खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होते. त्यांचा ड्रग माफियांशी संबंध नाकारता येत नाही त्यामुळे सर्वात आधी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी राजीनामा दिला होता. त्यानंतर चौकशीलाही सामोरे गेलो, असेही खडसे म्हणाले आहेत.

मुंबईहून जळगाव येथे आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची भेट खडसे यांनी घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आधीच शेकडो रुग्णांच्या जिवाशी खेळ -खेळणार्‍या गिरीश महाजनांनी प्रायश्चित्त करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. ‘कर नाही तर डर कशाला’ असे सतत म्हणणार्‍या मंत्री महाजनांकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !