गुटख्याचे वाहन सोडले : पहूरच्या फौजदारासह हवालदाराचे अखेर निलंबन


Gutkha’s vehicle abandoned : Final suspension of constable along with Faujdar of Pahoor जामनेर : पहूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्ने व हवालदार किरण शिंपी यांना गुटख्याचे वाहन सोडून दिल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बुधवारी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून हे वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्ने व हवालदार अमोल शिंपी यांनी 16 ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते. या वाहनावर कारवाई न करता ते साडून देण्यात आल्याची बाब उजेडात आल्यानंतर पोलिस दलावर टिकेची झोड उठली. पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक, हवालदार यांच्याबाबत पहूर पोलिस ठाण्याकडून कसुरी अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्याकडे देण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !