भुसावळात धनादेश अनादर : आरोपीला तीन महिन्यांची शिक्षा


Dishonor of check in Bhusawal : Accused sentenced to three months भुसावळ : श्रीराम फायनान्स कंपनी लि.भुसावळ शाखेकडून मनोज छत्रू पवार यांनी व्यावसायीक कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाची परतफेड त्यांनी वेळेवर न केल्याने कंपनीने त्यांना थकीत कर्जाची मागणी केली असता, संशयीताने त्यांना 11 जुलै 2019 या दिवसाचा स्टेट बँक ऑफ इंडीया, सावदा शाखेचा धनादेश दिला होता.

धनादेश न वटल्याने कंपनीने पवारविरूध्द न्यायालयात खटला दाखल केला असता न्या.के.एस. खंडारे यांनी आरोपी मनोज पवार याला दोषी धरीत एक लाख 75 हजार 627 रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचा किंवा तीन महिन्यांची साधा कारावासाच शिक्षेचा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्यात कंपनीतर्फे साक्षीदार संदीप जाधव यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. कंपनीतर्फे अ‍ॅड.मनिष जुमनानी यांनी काम पाहिले.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !