खडसेंची फडणवीसांवर पुन्हा टिका : खोट्या आश्वासनातून आंदोलने दाबण्याची ही त्यांची जुनीच सवय


Khadse criticizes Fadnavis again : This is their old habit of suppressing agitations with false promises मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवे्ंर फडणवीस यांच्यावर टिकेचे बाण चालवले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. खोट्या आश्वासनातून आंदोलने दाबण्याची ही फडणवीस यांची जुनीच सवय असल्याचे खडसे म्हणाले आहेत. आगामी निवडणुकीत सरकारची फार मोठी अडचण होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

निवडणुकांमध्ये या सरकारला बसणार फटका
मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी आमचे संकट मोचक (गिरीश महाजन) व एकनाथ शिंदे त्यांना भेटण्यासाठी गेले व त्यांनी जरांगे व त्यांच्या सहकार्‍यांना 40 दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द दिला मात्र आता तसे काहीच होत नाही. यांनीच त्यांना आरक्षण मिळेल म्हणून उचकावले होते. जरांगे पाटील यांचे उपोषण व मराठा आरक्षणाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होईल, असे दावा खडसे यांनी यावेळी केला.

पालकमंत्र्यांवर डागली टिकेची तोफ
पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना आलेल्या 137
कोटींच्या नोटीशीवर भाष्य करताना दाल में कुछ काला, असे म्हटल्यानंतर खडसे यांनी या वाक्याचा समाचार घेत ‘वो काले लोग है, उन्हे सब कालाही दिखेगा’, असा टोला लगावला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !