दहिगावात दुर्गोत्सव मंडळाचा मंडप जाळला : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


Mandap of Durgotsav Mandal burnt in Dahigaon : Case registered against two यावल : यावल तालुक्यातील दहिगाव या गावात पटेल वाड्यात बसवण्यात आलेल्या दुर्गोत्सव मंडळाचे मंडप पेटवून गावात जातीय तेढ निर्माण करण्याचा दोघांनी प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. दोघांना मंडप पेटवतांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर संशयित पसार झाले तर तातडीने आग विझवण्यात आली. याबाबत यावल पोलिसात दहिगावातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी तातडीने विझवली आग
दहिगावातील पटेल वाड्यात साई दुर्गा उत्सव मंडळ आहे. या मंडळाने एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मंडप उभारून घटस्थापना करून आई दुर्गेची मुर्ती बसवली आहे. मंडळाने उभारलेल्या मंडपाला शनिवारी मध्यरात्रीनंतर गावात जातीय तणाव व वाद निर्माण व्हावा या उद्देशाने वैभव रवींद्र पाटील व पंकज उर्फ झगा संतोष पाटील या दोघांनी आग लावली. हा प्रकार हा दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या निर्दशनास आल्यानंतर संशयितांनी पळ काढला. याबाबत तातडीने मंडळाचे अध्यक्ष व इतर ग्रामस्थांना माहिती देण्यात आली व मंडपाची आग विझवण्यात आली. याप्रकरणी श्री साई दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !