डांभूर्णी गावात 29 वर्षीय महिलेचा दोघांनी केला विनयभंग


A 29-year-old woman was molested by two men in Dambhurni village यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे नातेवाईकांच्या घरी आलेल्या 29 वर्षीय विवाहितेचा गावातील दोघांनी विनयभंग केला. महिलेच्या नातेवाईकांच्या दोघांनी दारूच्या नशेत येवून तिला शिवीगाळ करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यानंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील संभाषण करीत केला विनयभंग
डांभूर्णी येथील आपल्या नातेवाईकांकडे 29 वर्षीय महिला आली असता नातेवाईकाच्या घरी रात्री गावातीलच सागर बाविस्कर व भैय्या युवराज कोळी या दोघांनी येत महिलेचा हात धरून तिला घराबाहेर ओढले व महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले व अश्लील संवावद साधून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी सागर बाविस्कर व भैय्या कोळी या दोघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात विनयभंग सह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !