टी.डी एफ.आता धरणे आंदोलन करणार ?. प्र.ह.दलाल यांचा संतप्त सवाल


भुसावळ : कंत्राटी भरती, जुनी पेन्शन योजना या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर स्वतःचे पाप लपवून त्यांची दिशाभूल करणार्‍या ढोंगी नेत्यांची लक्तरे वेशीवर टांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाठाळांच्या माथी काठी हाणली आहे.

टी.डी एफ. आंदोलन करणार का?
2003 पासून अगदी 2022पर्यंत सत्तेवर असणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडी सरकारनेच कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता व त्यावेळी शिक्षक आमदारही मूग गिळून बसले होते हे स्पष्ट केले. जुनी पेन्शन योजना ही याच पक्षाच्या नेत्यांनी बंद केली व त्यानंतरही दीर्घ काळ ते सत्तेत होते. सत्ता जाताच आंदोलन करून कर्मचार्‍यांची माथी भडकावयची, असा प्रकार सुरू आहे. आता शिक्षक व सर्वच कर्मचारी वर्ग अश्या ढोंगी व दुतोंडी नेत्यांचे मुखवटे फाडल्या शिवाय राहणार नाही. आता कराल का ह्या विषयावर टी.डी एफ. आंदोलन? असा सवाल भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारीणी सदस्य व ज्येष्ठ शिक्षक नेते प्र.ह.दलाल यांनी पत्रकान्वये विचारला आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !