कार घेण्यासाठी माहेरून तीन लाख न आणल्याने विवाहितेचा छळ
भुसावळ : माहेरून व्यवसाय करण्यासाठी व कार घेण्यासाठी तीन लाख रूपये न आणलयाने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरूध्द हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल.
असे आहे छळ प्रकरण
भुसावळ येथील माहेर असलेल्या स्नेहा रोशन इंगळे (वय 25) यांचा विवाह हा मुक्ताईनगर येथील अष्टविनायक कॉलनीतील रोशन महादेव इंगळे यांच्याशी झाला होता मात्र पती रोशन इंगळे यांच्यासह सासरे महादेव जानुजी इंगळे, सासू विमल इंगळे, ननंद रिना महादेव इंगळे (सर्व रा.अष्टविनायक कॉलनी, मुक्ताईनगर) यांनी वारंवार पैश्यासाठी विवाहितेचा छळ केला. विवाहितेच्या अंगावरील सोने काढून घेतल तसेच शारीरिक व मानसिक छळ केला, शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, म्हणून विवाहीतेच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हवालदार समाधान पाटील हे करीत आहे.


