दोन गुन्ह्यातील तक्रारदारांना रेल्वे पोलिसांकडून मोबाईल परत


भुसावळ : वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात रेल्वे प्रवाशांचा मोबाईल प्रवासादरम्यान चोरीला गेला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला होता. भुसावळ रेल्वे न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला तो परत करण्यात आला.

मूळ तक्रारदाराला मिळाला मोबाईल
तक्रारदार शिक्षक संदीप शांताराम क्षिरसागर (36, कोठारी वाटिका दोन, मलकापूर, जि.अकोला) हे डाऊन गीतांजली एक्स्प्रेसच्या जनरल कोचने प्रवास करीत असताना गाडी भुसावळातील प्लॅटफार्म क्रमांक सातवर आल्यानंतर संशयीत आरोपी सादीक शेख नैज्जुद्दीन शेख (खान, 19, सुन्नी मशिदीजवळ, पिंप्राळा, जळगाव) याने 15 हजारांचा मोबाईल लांबवला होता. 28 जानेवारी 2018 रोजी ही घटना घडल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. दुसर्‍या घटनेत तक्रारदार पुष्करसिंह राजीवसिंह तोमर (35, विण्डवा, चंबल, जि.मुरैना) हे 22 मार्च 2019 रोजी लष्कर एक्स्प्रेसने जळगाव येथून प्रवास करीत असताना 10 हजारांचा मोबाईल चोरट्याने लांबवला होता. या प्रकरणी सोमनाथ महादू पाटील (शाहू नगर, सुनी मशिदीजवळ, जळगाव) यास 17 जानेवारी रोजी अटक करण्यात येवून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यातील मोबाईल मूळ तक्रारदाराला रेल्वे न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !