चाळीसगावात डेक्कन क्वीनखाली अनोळखीची आत्महत्या
चाळीसगाव : डेक्कन क्वीन एक्स्प्रेसखाली झोकून देत 35 वर्षीय अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील कॅन्टीनसमोर घडली. या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी इसमाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. उंची 5.5 फूट, रंग सावळा, शरीर बांधा सडपातळ, चेहरा गोल, नाक बसके, डोळे लहान काळे, मूछ बारीक तसेच उजव्या हाताच्या पोटलीवर फुल गोंदलेले असून अंगात फुलबाहीचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पँट आहे. ओळख पटत असल्यास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या एएसआय पुष्पा रामटेके (9049953140) वर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.




