रायपूरच्या ज्ञानगंगा विद्यालयातून 47 हजारांचे साहित्य लांबवले
47,000 worth of materials were sent from Gyanganga Vidyalaya, Raipur सावदा : रायपूर, ता.रावेर येथील ज्ञानगंगा विद्यालयातून चोरट्यांनी 57 हजारांचे साहित्य लांबवले. याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शैक्षणिक साहित्याच्या चोरीने खळबळ
विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष राजाराम पाटील (55, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) यांनी सावदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी 28 ते 29 नोव्हेंबरदरम्यान रायपूर येथील ज्ञानगंगा विद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून 15 हजार रुपये किंमतीचे एलसीडी प्रोजेक्टर, पाच हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रीक वजनकाटा, पाच हजार रुपये किंमतीचे एम्प्लिफायर व माईक, दोन हजार रुपये किंमतीचे एच.पी.कंपनीचे मॉनिटर, 15 हजार रुपये किंमतीचे डेल कंपनीचे कम्प्युटर असे एकूण 57 हजारांचे शैक्षणिक साहित्य लांबवण्यात आले. तपास हवालदार विजय पोहेकर करीत आहेत.


