भुसावळ शहरातून दुचाकी लांबवली


Bike extended from Bhusawal city
भुसावळ :
शहरातील एम.आय.तेली पेट्रोल पंपासमोरून सर्व्हिस रोडवरून अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा
शोएब शेख शरीफ खाटीक (29, मल्हारपूरा, भवानी माता मंदिराजवळ, चोपडा) यांच्या फिर्यादीनुसार, 28 रोजी सकाळी 11.30 ते 1.30एम.आय.तेली पेट्रोल पंपासमोरून सर्व्हिस रोडवरून अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर (एम.एच.19 बी.वाय.1086) लांबवली. तपास हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !