नांदवेल गावात धाडसी घरफोडी : 94 हजारांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Nandvel village : 94 thousand instead of loot मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेल येथे बंद घरातून चोरट्यांनी 94 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धाडसी घरफोडीने खळबळ
दीपक बुधा वाघ (49, नांदवेल, ता.मुक्ताईनगर) हे नांदवेलला परीवारासह वास्तव्यास आहेत. रविवार, 26 रोजी सकाळी साडेनऊ ते दिड वाजेदरम्यान घरातील पहिल्या खोलीतील लाकडी कपाटातील कुलूप कुणीतरी उघडत त्यातून 20 ग्रॅम वजनाची व 80 हजार रुपये किंतीची सोन्याची चैन व धम्मचक्र असलेले पेंडल, सहा हजार रुपये किंमतीचे ओम पान असलेले पेंडल असा एकूण 94 हजारांचा मुद्देमाल लांबवला. वाघ हे घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक हरीष गवळी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !