फळ पीक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी तक्रार निवारण समिती
खासदार रक्षा खडसे यांच्या मागणीनंतर कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे आश्वासन
Grievance Redressal Committee for Pending Benefit of Fruit Crop Insurance भुसावळ : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आंबीया बहार 2022 मध्ये विमा उतरविलेला शेतकर्यांना अद्यापपर्यंत पीक नुकसानीबाबत पीक विम्याचा लाभ प्रलंबित असून सदर शेतकर्यांच्या असलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी जिल्हाधिकार्9यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्याची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी चार दिवसात समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दिल्लीतील कृषी मंत्रालयात खासदारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व शोभा करंदलाजे बैठकीस उपस्थित होते.
त्या शेतकर्यांना मिळावी संधी
फळ पिक विमा योजना आंबिया बहार 2022 मध्ये विमा उतरविलेल्या 75 हजार शेतकर्यांच्या शेताचा सॅटेलाईट यंत्रणेद्वारे सर्व्हे केला असता एकूण 10 हजार 619 शेतकर्यांनी विमा कालावधीत कोणतीही पीक लागवड केले नसल्याचे विमा कंपनीच्या निदर्शनास आल्याने विमा लाभ नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले परंतु खासदार रक्षा खडसे यांनी यापैकी अनेक शेतकर्यांच्या शेतात पाहणी केली असता केळी पीक आढळून आल्याचे सांगितले. त्यावर 10 हजार 619 शेतकर्यांना संधी म्हणून *जल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली. चार दिवसात समिती गठीत करण्यात येईल व समितीकडे विमा नाकारण्यात आलेल्या शेतकर्यांनी अर्ज करून संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर त्वरीत समस्येचे निवारण करण्यात येणार असल्याचे मंत्री तोमर म्हणाले.







