रावेर शहातील अल्पवयीन तरुणीला पळवले
रावेर : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलीच्या 35 वर्षीय आईने रावेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या रखवालीतून त्यांची 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला सोमवार, 4 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.


